आजचा लग्नानंतरचा आठवा दिवस संपला. मी झोपतेय उद्या बघु काय होत.
०२DATE 03 JAN 2018
आज मी सकाळी काहीच केल नाही. अन्वित बाहेर गेलेला मी जेवण बनवल होत पण तो जेवलाच नाही. मला खूप वाईट वाटल. पण नंतर कळाल कि त्याला एका कंपनीतून इंटरव्हिवसाठी बोलावलेल आणि तो त्याचसाठी गेलेला. सकाळी आवरून गेलेला संध्याकाळी साडेचारला आला. मी मग त्याला चहा बनवून दिला. अन्वित मला खूप आवडायला लागला. म्हणजे लग्न होऊन एकच आठवडा झाला आणि लगेच त्याने चांगली नोकरी शोधायला सुरुवात केली. माझ्यासाठीच ना. मला आवडला तो त्याचसाठी. खूप चांगला आहे तो. आणि तो अजूनच आवडला आज संध्याकाळपासून.
सकाळच जेवण गरम करायला घेतल मी आणि अन्वित पुन्हा घरी नव्हता. आता मला काळजी वाटायला लागली. म्हणजे सकाळी तो बाहेर गेला ते ठीक होत पण आता साडे नऊ वाजलेले. मी साडीच घालत होते सुरुवातीला. म्हणजे आईंना तसच आवडत होत. पण एक गोष्ट माझ्या लक्षातच आली नाही. अन्वित सोबत आई आणि बाबा पण घरी नव्हते. पण माझ्या लक्षात फक्त अन्वितच होता. मी साडी जरा नीट केली. आणि बाहेरच्या खोलीत आले. दार उघडून आता रस्ता दिसेल तिकड अन्वितला शोधायला जायचं अस ठरवल मी. दार उघडल आणि दारात अन्वित हातात दोन पिशव्या घेऊन. हायस झाल क्षणात. मी त्याच्या हातातून त्या पिशव्या घेऊन आत गेले. अन्वित दार लावून घेत होता. इकड आत मी किचनमध्ये येऊन पिशव्यात काय आहे बघितल तर आतून खूप भारी असा पुलावचा वास आला. पुलाव.....? मला खूप म्हणजे खूप आवडतो. पण अन्वितला कस माहित ? मी तर त्याला सांगितल नव्हतच. मी मग पुलाव दोन ताटात वाढून घेत होते. आणि माग येऊन अन्वितने मला घट्ट पकडल. हातातली भातवाडी टेबलावर पडली. लागलीच अन्वितने माझ्या केसांना डावीकडच्या खांद्यावर सरकवल आणि उजव्या मानेवर, खांद्यावर अगदी धुंद होत कीस करण सुरु केल. मला काहीच समजत नव्हत. पुढे त्याने मला त्याच्या बाजूला फिरवल. माझ्याकडे एकटक बघत होता आणि तो बोलला ‘खूप सुंदर दिसतेस तू’ आणि काय हव असत एका लग्न झालेल्या मुलीला ? नवऱ्याने असच काहीस म्हणाव असच वाटत ना. या एका वाक्यानेच तर मुलीच मन अगदी बर्फासारख विरघळत आणि तेवढ्यात बर्फासारखाच त्याचा ओठ अगदी काहीसा पाण्यावरून घसरावा आणि जेव्हा वितळेल तेव्हा पाण्यातच लीन व्हाव अगदी तसा त्याचा ओठ माझ्या खालच्या ओठात स्थिरावला. आणि मी त्याच्यात तो माझ्यात लीन झाला. थंडीच्या दिवसात हा थंडीचा क्षण जेव्हा अंग गरम करून टाकतो शब्दात नाही व्यक्त करू शकत ती भावना. आता मला रहावत नव्हत आणि त्याला हि ते त्याच्याकडे बघून जाणवत होत. पण सकाळी त्याने काहीच खाल्ल नव्हत. आणि मला आठवल आई बाबा येतील. मी आई नुस्त म्हंटल आणि तो बाजूला झाला. इकड तिकड बघायला लागला. आणि परत माझ्या जवळ येऊन मला मिठी मारली. मी विचारल आई येतील ना. मला म्हणतो कसा, मी त्यांना सोडून आलोय मावशीकडे. ते आता दोन दिवसांनी येतील. मावशी म्हंटली एकांत मिळेल तुम्हाला. सोड आई बाबांना इकड मी घेते त्यांची काळजी. मग काय आलो सोडून त्यांना. आणि मग मीही डोळे मिटले आणि त्याने मला अजून घट्ट जवळ ओढलं. पुढे बरच काही झाल. आणि सगळ काही झाल्यावर आम्ही जेवण केल. जेवण केल आणि मग झोपताना पुन्हा प्रेम केल. माझ्यासाठी सगळ नवीनच होत. पण नाविन्य कुणाला आवडत नाही. मी ते नाविन्य जगले. अनुभवले. पण इथ नाही लिहिणार कारण ती सुध्दा भावना इथे लिह्ण्यासारखी नाही. आणि आजची हि मधुचंद्राची रात्र अन्वित-श्रीशामय झाली. रात्री पावणे दोनला अन्वित थकून झोपून गेला आणि मी त्याच्या डोक्याला माझ्या छातीशी लहानबाळासारख कवटाळून तीनपर्यंत जागी होते. कधी झोपले माहितच नाही.

०३DATE 4 JAN 2018
आज सकाळी मी पहिली उठून सगळ आवरून अन्वितला त्याचा आवडणारा उपमा बनवून देणार होते. पण काल रात्रीच्या प्रेमाने रात्री मजा आली पण गाढ झोप लागली. कंटाळा-थकवा आला. माझे डोळे उघडले तेव्हा शेजारी अन्वित नव्हता. डोळे चोळत चोळत मी तोंडाचा आs करून आळस दिला आणि तितक्यात नका तोंडात एक भडक वास गेला आणि जोराचा ठसका लागला. जोरात मी शिंकले. काय झाल समजल नाही डोळ्यातून पाणी आल. जीव कासावीस झाला. जीव असा घशाशी आला. श्वास अडकला. म्हणून जागची उठले पांघरून बाजूला सारून. साडी सगळी विस्कटलेली. म्हणजे तशी नव्हतीच अंगाभोवती. कशीतरी केली अंगाबरोबर. आरशासमोर जाऊन चेहरा नीट केला. केस नीट एकाबाजूला केली. तेवढ्यात अन्वित आला हातात ब्रश आणि पेस्ट घेऊन. मी काही बोलायच्या आत मला हाताला धरल आणि बाथरूममध्ये घेऊन गेला. आत गरम पाणी बादलीत काढून ठेवलेल. माझा टॉवेल खिट्टीला अडकवलेला. आणि बाथरूमच्या दारात ठेवलेल्या एका स्टुलावर नवीन पंजाबी ड्रेस ठेवलेला. मी आवरायला लागले. आवरून झाल. ड्रेस घातला. आणि बेडरूममध्ये आले. तर अन्वित टेबलावर उपीट ठेवत होता आणि चहासुध्दा. मला म्हणाला आधी खाऊन घे आणि मग आवर. मी तसच केल. त्याने मला भरवल. मी गेले भरवायला पण नको म्हणाला. मला त्या क्षणाला अस वाटल हा क्षण असाच रोज रोज नशिबात यावा. दोघांच खाऊन आणि चहा पिऊन झाला. तो सगळ घेऊन आत गेला. मी माझ आवरत होते. केस धुतलेली मी. कालच्या त्या सगळ्याने डोक अगदी जड झालेलं आणि आज देवाला पण जायचं होत म्हणून केस धुतली. आरशात एकसारखं बघून मला माझीच लाज वाटत होती. तोच तो कालचा क्षण डोळ्यासमोर आला. तो अनुभव ते सुख आठवून डोळे मिटलेच ना अपोआप. तेवढ्यात एक असा थंड श्वास मानेला लागायला लागला. माझे डोळे बंदच होते. पाठीवरून पोटाशी दोन हात आले. आणि कचकन घट्ट तिथेच बांधले गेले. माझा डावा हात त्या पोटावरच्या हातांवर गेला. आणि उजवा हात माझ्या मानेवर कीस करणाऱ्या अन्वितच्या केसांत गेला.
किती प्रेम करतो अन्वित माझ्यावर..... नजर नको लागायला. कुणाचीच माझी सुध्दा. पुढे ? काही नाही त्यानेच सावरल स्वतःला आणि मला सुध्दा. मी आवरल. आम्ही दोघ मग एका देवीच्या मंदिरात गेलो. तिथून गेट वे ऑफ इंडियाला गेलो. असच मग इकड तिकड फिरून आम्ही दुपारी चार पर्यंत घरी आलो. येताना बसमध्ये एक जोडप आमच्यासमोर बसलेलं होत. आम्ही दोघे उभे होतो. बसमध्ये जागा नव्हती ना. ते जोडप निदान असेल साठ-पासष्ठ वर्षाच. ते आजोबा अगदी त्या आज्जीकडे एकटक बघून सगळ त्याचं ऐकत होते. एके ठिकाणी बस थांबली आजोबा उठले त्यांच्यात एवढी ताकद नव्हतीच. तरीही त्या आज्जीना त्यांनी हात दिला. त्यांचा हात धरून दोघे सावकाश बसमधून उतरले. बस पुढे निघाली मी वाकून खिडकीतून बघायला लागले. ते दोघ एका पाणीपुरी विकणाऱ्या मुलापाशी गेले. आणि त्यांनी पाणीपुरी मागितली. प्रेम असत पण ते इतक इतक वर्ष असत ते त्या दोघांना बघून जाणवल. अन्वितने पण असच माझ्यावर म्हातारपणापर्यंत प्रेम कराव मला समजून घ्याव अस वाटल मी एक क्षण अन्वितकडे बघतील तर तो वेडा माझ्याकडेच बघत होता. अगदी लाजल्यासारखच झाल. आम्ही घरी आलो. जेवलो आणि झोपलो.
DATE 5 JAN 2018
आज अन्वितला एक कॉल आला. आणि अन्वित खुश झाला. तो इंटरवहीव पास झालेला. त्याला आज कामावर बोलावल होत. त्याला तसा कॉल नऊ वाजता आला आणि अकराला यायला लावलेलं. त्याची गडबड वर माझी गडबड. त्याला डबा वैगरे बनवून द्यायचं. त्याचे कपडे वैगरे सगळ बघून द्यायचं. पण कधी तरी हे करायचंच होत मला. सगळ उरकलं मी आणि अन्वितला डबा दिला. तो खूप छान दिसत होता आज. सगळ नीट आवरून इस्त्रीचे कपडे नीट घालून निघाला त्याला मी फाईल आणि डबा दिला. तो गेला मी दार लावून घेतल. माघारी फिरले तर दाराची कडी वाजली. मी दार उघडल. तर त्याचा रुमाल राहिलेला. मी द्यायला निघाले तर माझ्या आधी आत गेला टेबलावरून रुमाल घेऊन खिशात ठेवला. आणि माझ्या जवळ येऊन माझ्या गालाला कीस करून माझ्याकडे बघून गालात हसला. आणि निघून गेला. मी दार लाऊन घेतल. दिवस कसा असा संपतच नव्हता. म्हणजे आठवडाभर दोघ सतत सोबत असायचो आता नसणार या विचारानेच घर खायला उठायला लागल. कुठ घर आवर. भांडी घास. दोघांचे कपडे धु. टीव्ही बघ. जेवण कर करत नंतर दुपारी झोपले. कसा तरी वेळ घालवला. आणि संध्याकाळी अन्वित आला. आपल्या संसारासाठी आपला नवरा काम करून नोकरी करून घरी आल्यावर बायकोला किती आनंद होतो याच शाब्दिक वर्णन नाही. मग त्याच्या आवडत मी जेवण बनवल. त्याने मला काय काय झाल आज ते सगळ सांगितल.

०४DATE 12 JAN 2017
अन्वितला नोकरी लागल्यापासून मला त्याच्यासाठी काय करू काय नको झालेलं. आठवडाच झाला आणि मला एके ठिकाणाहून कॉल आला. मला हि जॉब लागला. अकरा ते सहा वेळ आहे कामाची. अन्वित नऊ ते सात जातो. अन्वित नंतर जायचं आणि अन्वितच्याच आधी यायचं. हि वेळ मला आवडली. आज डायरी मी हि रात्री लिहितेय. तर आज सकाळी मी सहाला उठले. सगळ आवरून पहिलं जेवण बनवल. मग नाष्टा बनवला. अन्वितला उठवल. त्याच सगळ आवरून झाल कि त्याला नाष्टा द्यायचा या विचारात मी होते तर हा दाढी कापायला गेलेला. घरी आला तर एवढूडस तोंड घेऊन आला. मला खर हसायला आल. पण गोरा आहे तो उंची हि आहे त्यामुळे दिसत त्याला काहीही चांगल पण मला अशी दाढी मिशी असलेले पुरुष पहिल्यापासून आवडतात. म्हणजे माझे बाबा पण अगदी शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवायचे अगदी तशीच त्रिकोणी. मिशीला सतत ताव द्यायचे. मग ते लहानपणापासून त्यांना तस बघून एक पुरुषी रुबाब म्हणतात तस मला आवडायला लागल. अन्वितने पण चांगली दाढी वाढवलेली. त्याची एकतर तब्येत चांगली आहे केस आणि अशी दाढी ठेवलेली आणि नेमकी आज कापली. का विचारल तर मिटिंग होती ऑफिसमध्ये म्हणून तो कापून आला. मग त्याला कढत पाणी काढून दिल अंघोळीला. पोहे परत जरासे गरम करायला घेतले. त्याच आवरून खाऊन झाल. तो निघून गेला. मीही मग आवारावर केली. आज माझा जॉबचा पहीला दिवस होता. सगळ आवरून मी निघाले. तिथ काय कॉम्प्यूटर समोर बसायचं आणि काम करायचं होत. कुठ बाहेर फिरण किंवा काय कुठ जाऊन कष्टाच अस काम नव्हत. हा पण जिकरीच काम होत. पतसंस्था असली तरी लाखोंच्या ठेवी तिथ होत्या. शिक्षक खात्याची ती पतसंस्था होती. पहिला आजचा दिवस कसा तरी होता. कसा तरी म्हणजे आयुष्यातल्या बऱ्याच महत्वाच्या गोष्टीतला पहिला दिवस कसा असतो अगदी तसाच. दोन वेळा माझ काम चुकल पण सावंत सर होते माझ्या बाबांच्याच वयाचे त्यांनी मला समजावलं. देशमुख सर चेअरमन होते ते तर अगदी माझ्याच वयाचे झालेले माझ्याशी गप्पा मारताना. अपर्णा म्हणून एक मुलगी आहे तीच आत्ताच लग्न ठरलय अस तिने सांगितल पुढच्या महिन्यात. ती काही जास्त बोलली नाही माझ्याशी. शिपाई आहेत कांबळे काका ते चहा इतका मस्त बनवतात ना इथ मुरले ना मी यांच्यात कि एकदा थर्मास मधून अन्वितला चहा घरी घेऊन जाणार आहे. खूप खूप सुंदर असतो त्यांच्या हातचा चहा. प्रगती नावाची एक मुलगी आहे. तीच पण लग्न व्हायचंय तिने मला खास एक ‘कॅडबरी’ दिली. मला खूप आवडली ‘कॅडबरी’ आणि ती सुध्दा. ती माझ्याच शेजारी बसायला होती. नुसती बडबड करत होती. त्यामुळे आज माझा पहिला दिवस आहे अस वाटतच नव्हत. घरी येताना मी अन्वितसाठी एक ‘कॅडबरी’ विकत घेतली घरी जेव्हा तो आला तेव्हा त्याला दिली. आज अन्वितला काय झालेलं कुणास ठाऊक पण आज खूप खुश होता. नंतर झोपताना सांगितल त्याने त्याची मिटिंग बेस्ट झाली. त्याच कौतुक झाल तिथ. रात्री आम्ही शेजारीच अस झोपलेलो. तेव्हा त्याने विषय काढला. तो म्हणाला कि आपण चान्स घ्यायचा का ? अर्थातच मला नको असेल का ? मी होकार पटकन दिला पण तोच म्हणाला कि अजून चार पाच महिने थांबू. घराच काय होत का बघू कर्ज वैगरे काढून. मीही त्याच्या होकारात होकार मिळवला. मला जवळ ओढून घेत त्याने माझ्या अंगावर हात टाकला आणि झोपून गेला.
जगातलं मोठ सुख अस काय आहे ? काहीच नाही. माणसाकडे पैसा अडका नसेल तरी चालेल माणसाकडे फक्त मानसिक सुख हव. ते जर का असेल तर माणूस कधीच दुःखी होऊ शकत नाही. आणि माझ मानसिक सुख म्हणजे माझा नवरा हा असा माझ्या जवळ आहे म्हणून मी जगातली सर्वात सुखी स्त्री आहे असा एक विचार मला माझ्या मनात आला. तो नसेल तर मी असेल शक्यच नाही. खूप प्रेम करतो तो माझ्यावर खूप काही करण्यासाठी धडपडतो तो माझ्यासाठी. खरच माझी आई म्हणते अगदी तस आहे नशिबात असाव्या लगतात काही गोष्टी त्या जर का असतील नशिबात तर तसच होत. नाहीतर कितीही आपली आपटा काहीच मिळत नाही मेल तरी. माझ्या नशिबात काय आहे माहीत नाही पण अन्वित सारखा नवरा आहे हे सुध्दा काही कमी नाही. त्याचे आई बाबा अजून मावशीकडेच आहेत. उद्या ते येणारेत. उद्या दोघांना काम आहेत आई बाबा संध्याकाळी येणारेत आणि म्हणून मी आता झोपते. रात्रीचे दोन पाच झालेत. अन्वित गाढ झोपलाय मी हि त्याच्या उबीत शिरते आता.
०५
01 FEB 2018
आज अन्वितचा वाढदिवस. मला माहित नव्हत. फेसबुकवरच्या मेसेजने मला समजल. इतक्या दिवसात मला लक्षातच आल नाही कि त्याला त्याचा वाढदिवस कधी आहे विचारायचं. आणि त्याला हि माझा माहित नाही. ठरवून केलेलं लग्न हे अस अनोळख्यासारख असत. प्रत्येक गोष्टीची ओळख करून घेता घेता कित्येक दिवस मध्ये निघून जातात. काही समजतच नाही आणि राहिलेली गोष्ट लक्षात आली कि अस वाटत हि क्षुल्लक गोष्ट आपल्याला माहित नाही खरच का ? तर मी उठले. आणि अन्वित शांत झोपलेला बघून मला त्याला उठवू वाटल. रोज तर झोपू देतेच ना मी. पण आज नाही. मी उठून त्याच्या जवळ गेले आणि त्याच्या कानात जोरात ओरडले. अन्वितला काय झाल काय माहित त्याने खांद्याने जोरात झिडकारल मला. मला कस तरी वाटल. पण मग पुन्हा मी त्याच्याजवळ गेले. आणि कानात त्याच्या बोलले, ‘हैपी बर्थडे अनु’. आणि अन्वित गालात हसला. मला ते दिसल पण त्याला समजल नाही. तो झोपायचीच नाटक करत पडून होता. मी त्याच्या खांद्याला चावले. आणि मग त्याने कूस बदलली आणि मला त्याच्यावर ओढून घेतल. माझे डोळे उघडे. माझी झोप उडालेली. पण तो डोळे मिटून होता. झोपेत होता तरी मला त्याने अचूक पकडल. आणि स्वतःवर घेतल. हे अस फिल्ममध्ये होत. होना...? नवीन नवीन लग्न असल कि असा हा रोमान्स सामान्य आहे. पण तो अनुभव घेताना काय होत जीवाच ते अनुभवनाऱ्यालाच माहित.
त्याच्या जवळ होते मी आणि हीच ती संधी समजून मी त्याला बोलले आज कामाला जाऊ नको आणि त्याने हि त्या लाडिक क्षणाला मला होकार दिला. आता आज आम्ही दोघेच घरी होतो. कुठ जाव म्हंटल तर हा आळशी मला म्हणाला घरीच बसू ना. आता मी काय बोलणार पुढे. मी हि होकार दिला. दोघांच आवरून झाल. नाश्टा झाला. आता पुढे काय ? काल माहित असत तर ऑफिसवरून घरी येताना काहीतरी वाटेत त्याला गिफ्ट घेतल असत. आणि आता त्याच्या देखत काय आणायला जायचं ते बरोबर नाही वाटत मला. मग मी बसूनच होते आतल्या खोलीत. तो बाहेरच्या खोलीत बसलेला टीव्ही बघत. बारा वाजत आलेले. अन्वित आत आला. कपाटातून एक पेन ड्राईव्ह काढला आणि बाहेरच्या खोलीत गेला. थोड्यावेळाने मला हाक मारेल हा अस वाटलच होत तितक्यात त्याचा आवाज आला. मला आत्याने हाक मारली. मी गेले बाहेरच्या खोलीत.
टीव्हीला पेन ड्राईव्ह जोडून त्याने एक फिल्म लावली होती. रॉकस्टार. रणवीर कपूरची. आम्ही ती बघत बसलो. इंटरव्हल होईपर्यंत दोघ मग्न झालेलो. नंतर त्याने फिल्म पुढे नेली. पुढचा भाग सुरु झाला. त्यात चालल होत नर्गिस फक्री आजारी पडते. मग रणवीर कपूर तिला भेटायला येतो. त्याच्या स्पर्शामुळे ती बरी होते. अस काही होत. खरच इतकी जादू असते का स्पर्शात या विचारात मी कधी माझ डोक अन्वितच्या खांद्यावर टेकवल आणि त्याच्या हातात माझा हात दिला माझ मलाच कळाल नाही. अन्वितच्या डोळ्यात पाणी होत. मला हि तस रडू येत होत.
थोड्यावेळाने मीच अन्वितला म्हंटल बंद कर फिल्म आज वाढदिवस आहे तुझा आणि असे मरा-मरीची फिल्म नको दुसरी एखादी लाव कॉमेडी. तर नाहीये अस म्हणाला तो मला. तिथून निघून तो दारात गेला. मी विचारल कुठ चालला. तर मेडिकल मधून आलोच अस म्हणाला. तो निघून गेला आणि मला आठवल काल प्रगतीने दिलेली कॅडबरी माझ्या पर्समध्येच आहे मी पटकन आत गेले कॅडबरी बघीतली. होती तशी ती नीट. वेफरची होती त्यामुळे पातळ झाली नव्हती. मी फ्रीज मध्ये ती कॅडबरी ठेवली. थोड्यावेळाने अन्वित आला. जरा गालातच लाजत होता. मला काही कळाल नाही. मी गेले आत किचन मध्ये आणि फ्रीज मधून कॅडबरी काढली आणि अन्वितला दिली.
अन्वितने ती खायला सुरुवात केली. एक बाईट त्याने खाल्ला आणि एक बाईट मला दिला. मी खाल्ला. आणि अन्वित माझ्याजवळ आला मग कानात बोलला मला आज गिफ्ट देशील ? मी अर्थातच निःशब्द होते. मी त्याला विचारल काय हव तर मला त्याने खिशातून आणलेलं पाकीट दाखवल आणि म्हणाला मला आपल बाळ हवय. आता अंगातून त्राणच गेला. अस पटकन बोलला तो कि मी लाजू कि त्यला मिठी मारू कि काय म्हणजे नक्की काय करू समजतच नव्हत. मी लाजून होकार दिला तोही मान हलवून तोंडातून तर शब्द फुटतच नव्हते ना. मला म्हणाला आत जा आलोच. त्याने दार लावल बाहेरच. आत आला. मी बेडवर बसलेली. मधल हि दार त्याने लावल. त्याने शर्ट काढायला सुरुवात केली आणि मी माझे डोळे लाजेने मिटायला सुरुवात केली.
त्याचा वाढदिवस आणि आमच प्रेम एकाच दिवशी झाल. एकदम मेमोरेबल. तो माझ्या जवळ झोपून होता आणि मी त्याच्या जवळ. आता खर नवरा बायको झाल्यासारखं मला तरी वाटत होत.
०६
05 FEB 2018
माझ्या मनातल्या कित्येक भावनांना त्या दिवशी अन्वितने अगदी रीत केल. मी त्याची तो माझा झाला. त्याने आणलेलं ते पाकीट त्या दिवशी वापरलच नाही. साहजिकच सुख, आनंदी बातमीची शक्यता होती. अन्वितशी मी बोलले. तो या पुढच्या जबाबदारीसाठी तयार होता. नोकरी तर लागलेली त्याला आणि मला पण त्यामुळे वर्षभरात नोकरी करून दोघांनी पैसे साठवून एक अकाऊंट काढून त्यात सेव्ह करायचे. आणि मग पुढे वर्षभरात लागतील तसे त्यातले पैसे काढायचे अस आम्ही ठरवल. कारण नंतर अन्वितलाच सगळा भार येणार होता. कारण मला नोकरी करता येणारच नाही. मग अशावेळी बिचाऱ्याला लोड नको.
आम्ही मग बसून काल रात्री ठरवल. मुलगा झाल तर अमेय नाव ठेवायचं आणि मुलगी झाली तर मृण्मयी. मुलगा झाला तर त्याला सिव्हील इंजिनिअर बनवायचं आणि मुलगी झाली तर तिला कॉप्म्युटर इंजिनिअर. अन्वितला मुलगा हवा आणि मलासुध्दा. प्रेम वैगरे हा पौंगडअवस्थेतला एक सुखद प्रवास आहे. पण लग्न हे त्यापुढच काहीतरी वेगळच आहे. लग्नाचा प्रवास म्हणजे भारतातल्या महाराष्ट्रातल्या मुंबईत राहून विदेशातल्या युरोपला जाण्याचा प्रवास जणू. विचार केला आणि दीड-दोन लाख मिळाले लगेच विमानाच तिकीट काढल आणि लगेच गेल अस होत नाही. त्यासाठी पैसे कमवून साठवून जमवून मग बरच काही प्रयत्न खटपट करून तिकड जाव लागत इतक सहज सोप्प असत का ते ? तो तर प्रवास आहे. आठवड्याभराचा. सात दिवस सहा रात्रीपुरता. लग्न म्हणजे अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंतचा प्रवास आहे. अन्वित आणि माझा. आणि लवकरच येणाऱ्या बाळासोबत.
मी माझ्या मनात किती काही गोष्टीना सजवत असते. सजवत-सजवत ती स्वप्न मी त्यात इतकी रमते कि दिवस कसे निघून जातात कळतच नाही. वर्षाच्या सुरुवातीचा समागमचा क्षण असा काही डोळ्यासमोर येतो कि अस वाटत समागम आत्ताच होऊन आम्ही बाजूला झालोय. खरच पुरुषाविना स्त्री नाही आणि स्त्रीशिवाय पुरुष नाही. अन्वित मला मिळाला खूप सुखात आहे मी. माझ आयुष्य काय त्यातल्या त्यातच सुरु आहे. काटकसर हि आहे आमच्या संसारात पण त्याबद्दल खेद नाही पण त्यात हि होणार आमच एकमेकांशी प्रेमळ बोलण सुध्दा किती आनंद देऊन जात मला आणि त्याला.
लग्न हि कल्पना ज्याने कोणी शोधली त्याला बरेच लोक शिव्या देतात. पण मला अस वाटत त्या व्यक्तीला म्हणजे तो पुरुष असेल तर त्याला माझ्यासारखी आणि स्त्री असेल तर तिला अन्वितसारखा जोडीदार मिळाला असावा म्हणूनच त्यांनी जगातलं पाहिलं लग्न करण्याचा निर्णय घेतला असावा. नाहीतर लग्न हि कल्पना आणि संकल्पना आत्ता नसतीच. नव्याचे नऊ दिवस. आमचे आता सव्वा दोन महिने झाले पण अजून हि खूप छान सुरु आहे. अन्वित आज खुप थकून आला कामावरून मी त्याला जेवण दिल पण न जेवता झोपला. मी त्याला झोपू दिल. परत मी नऊला उठवल पण नकोच म्हणाला जेवण. मला हि गेल नाही. मी हि उपाशी आहे. बघू उद्या त्याच्याच सोबत नाष्टा करेन. आज माझ्याशी पण तो काही बोलला नाही. म्हणजे रोज कामावरून आला कि खूप बोलतो तसा पण आज बोलला नाही. खूप कंटाळला असणार. पण मला माहितीय त्याला आता पुढच टेन्शन आल असणार साहजिकच आहे. बाप म्हणून कुठे कमी पडायला नको असच त्याला वाटत असणार आणि म्हणून त्याने टेन्शन घेतलय. पण मी समजावेन त्याला उद्या. अस हि तो एकटा कुठ आहे मी हि करतीच आहे कि नोकरी. पैसे मीही साठवणार आहे. बाळ हि दोघांच आहे. खरच बालिश आहे अन्वित सगळ्याचा अगदी बारीकसारीक गोष्टींचा पण विचार करतो. आणि टेन्शन घेतो. घेतो ते घेतो आणि मला सांगत हि नाही. मीच ओळखायच त्याला काय टेन्शन आहे कि नाही वैगरे. सतत विचारल्यावर तो सांगतो. आणि सतत हसतमुख अन्वित मला हा अस मलून झालेला आवडत नाही. बघू उद्या आता विचारते काय म्हणतो तो ते. आता झोपते मी हि. अन्वितच्या जवळ झोपणार नाहीये मी. आज दोघांच्या मध्ये उशी ठेवून झोपेन म्हणजे सकाळी त्याला दोघांच्यातल अंतर दिसल कि मग येईल विचारायला काय झाल म्हणून मग त्याला सांगेन अस म्हणून आधी त्याच टेन्शन काय आहे ते त्याच्याकडून काढून घेईन. आणि मग काहीतरी त्याला उशीची थाप मारेन.

०७
06 FEB 2018
श्रीशा सात वाजून गेले तरी झोपून आहे. पाणी येऊन केव्हाचच गेल. पाणी भरायचं राहून गेल. वापरायच पाणी टाकीत पडल पण प्यायचं भरायचं राहील. काल भरलेल्या पिपातल थोड पाणी उरलय आणि एक बारकी पूर्ण कळशी आणि एक तळाला गेलेला हंडा. अन्वितला जाग आली. बघतो तर शेजारी श्रीशा झोपलेली. त्याला वाटल हाच लवकर उठलाय. म्हणून तिला न उठवता निवांत आत गेला दात घासले. थंडी वाजतीय म्हणून चहा बनवत ठेवला. तोपर्यंत मोबाईल मध्ये व्हिडीओ बघत बसला. ते झाल तो पर्यंत चहा उकळला. आत जाऊन चहा गळून घेतला आणि चहा पीत बसला. यात महत्वाची गोष्ट म्हणजे श्रीशा उठली नाही अजून म्हणजे अजून सात वाजलेच नाहीत अस त्याला वाटल. लोक म्हणतात घड्याळ आता आऊट डेटेड झालंय पण हातातल्या मोबाईलमध्ये बाजूला इवढूशे लिहिलेले आकडे बघायचं पण कधी कधी राहून जात म्हणजे मी तर कित्ती अशी न मोजता येईल अशी लोक हातात नाहीतर खिशात मोबाईल असून पण दुसऱ्याला विचारतात वाजले किती ?
तर सांगायचं हे होत कि या सगळ्यात अन्वितला वाजले किती हे बघायचं काही सुचल नाही. श्रीशाच्या भारोशी हा निवांत चहा पीत बसला. चहा पिऊन झाला. आत बेसिनमध्ये कप ठेवला पाणी घालून आणि आला श्रीशा जवळ. आता काय कराव म्हणून झोपला तिच्या शेजारी. सातचे नऊ झाले. ऑफिसची वेळ पण निघून गेली. श्रीशाला कॉल आला. तिला जाग आली. फोनवर बोलन झाल तीच आणि ती ताडकन उठली. नऊ वाजले ?
अन्वितला उठवल तर तो उठेना म्हणून ती पटकन पळत आत गेली नळ सुरु होते. तरी सुध्दा चालू बंद करून बघत होती आशेने कि पाणी येईल पण वेळ झालेली. पाणी येऊन गेल होत. तिने पिपाच झाकण काढल तर त्यात पाणी कमी. हंडा तळाला गेलेला. अन्वितपाशी येऊन तिने त्याला उठवल. तो उठला. तिला अस बावरलेलं बघून अन्वित लाडात आला आणि तिला जवळ घेऊन गालावर कीस करायला गेला तिने बाजूला केल. सकाळी सकाळी असल काही नको अस ति म्हणेल अस त्याला वाटल पण तिने विचारलं सकाळी चहा तुम्ही केलेला का?
अन्वित डोळे चोळत हो म्हणाला. ती चिडली. बोलायला लागली.
श्रीशा : उठलेला न सकाळी मग मला कोण उठवणार ? वाजले किती बघितल का ? ऑफिस बुडल घरात पाण्याचा थेंब नाही. कस होणार ? जेवण कस बनवणार ?
अन्वित : किती वाजले ? साडे सात का ? असुदे ना.
श्रीशा : नऊ. वाजलेत बघ जरा.
अन्वित खडबडून जागाच झाला. तरी हि शांतच बसून होता.
श्रीशा : उठवल नाहीत मला ते हि ठीक. पण उठलेला तर आवरून बसायचं ना परत झोपला कशाला ? आणि उठून अगदी चहा बनवलाय त्या भांड्यात पाणी कोण घालून ठेवणार ? मला त्या चहाच्या गाळाचा वास नाही आवडत उलटी आल्यासारखं होत.
अन्वित : घातलय कि पाणी.
श्रीशा : फक्त कपात. भांड तसच आहे. आणि काय केलय तुम्ही ?
अन्वित : फक्त चहा.
श्रीशा : ते नाही म्हणत मी. चहा बनवला कपात पाणी घातल चहाच भांड बेसिन जवळ ठेवल सगळ केलत हो ना ? इथ येऊन दोघांच्या मधली उशी काढून जवळ झोपलात पण एक विसरलात. आठवतय का ?
अन्वित : काय ? दात घासुनच पिला चहा.
श्रीशा : ते नाही. दुसर आहे आठवा.
अन्वित : नाही... काय राहील ? टॉवेल राहिला का बाहेर खुर्चीवर ओला ? ते मी तोंड धुतलेलं ते पुसलं फक्त म्हणून जरासा ओला झालेला.
श्रीशा : नाही. चहा केला. चहा गाळून घेतला बाहेर जाऊन चहा पिला परत आत आला. पण तुमच लक्ष नाही गेल का गैसकडे ? चालूच होता...पेटत. मी आत गेले आत्ता तेव्हा स्वीच बंद केल. दोन तास राहिला कीने सुरु. वाया गेला न आठवड्याभराचा.
अन्वित : सॉरी.
श्रीशा : सॉरी कस बोलता ? काटकसर करायचा प्रयत्न करतीय मी. त्यात आपल्याला आता पुढच बघायचं आहे ना ? मग अस कस चालेल.
अन्वित : अग आपल्या लग्नाला दोन महिने झालेत. तू तर अगदी जुनी बायको झाल्यासारखं चिडतीयस. बोलतीयस मला.
श्रीशा : जुन नव काही नसत. बायको बायको असते. त्यात नव जुन काही नाही.
अन्वित : बर तू आवर मी बिसलेरी आणतो मोठी पाच लिटरची. अस हि मी आज जाणारच नव्हतो ऑफिसला तू पण नको जाऊ.
श्रीशा : माझ्या घरची नाही पतसंस्था. नाही मिळणार सुट्टी.
अन्वित :बघ ना माझ्यासाठी ?
श्रीशा : आजारी आहे सांगते.
तिने कॉल लावला.
०८अन्वित आवरत होता. इकडे मी सुट्टी काढली. आता काय घरात डोक्याला डोक लावून बसायचं होत का ? एकत्र घरात पाणी नाही. काही कारण पण नव्हत सुट्टी काढायचं. आणि आत्ता एक सुट्टी काढली विनाकारण पण गरज असेल तेव्हा मिळेल का सुट्टी ? पण जाऊदे अन्वितला वाटत मी बसव घरी तर त्याच्यासाठी काहीही. त्याचा आनंद तोच माझा. अन्वित आला केस पुसत टॉवेलने. श्रीशा : केस धुतली ?अन्वित : हो. श्रीशा : पाणी नाही आधीच आणि डोक्यावरून अंघोळ केली काय गरज होती का ?अन्वित : आज आठवल मला म्हणून केली. श्रीशा : उद्या केली असती तरी चालली असती. अन्वित : ती ओली केस वाळत नाहीत आणि ती तशी ओलसर केस घेऊन ऑफिसमध्ये वावरताना कस वाटत.श्रीशा : बर मी करते आता अंघोळ. मी अंघोळीला गेली. पाणी पाणी नुस्त डोक्यात माझ आणि त्यात मी टॉवेल विसरले आतच. अन्वितला हक मारून टॉवेल मागितला तर मुद्दाम मला त्याचा ओला टॉवेल दिला आपन न बघता अंगाला लावला आणि ओल्या टॉवेलने अजून थंडी वाजली. एकत्र जास्त पाणी लागू नये म्हणून जरा कमीच गरम पाणी केलेलं त्याने अंगात हुडहुडी भरली. आणि त्यात ह्याने अस केल. मी पुन्हा माझा टॉवेल मागितला. तोवेल घेऊ दाराशी आला. अमी चार बोट बहर जातील एवढच दर उघडून हात बाहेर काढला तर हाताला टॉवेल आला. टॉवेल मी ओढला तर आत येईनाच. त्याने घट्ट पकडून ठेवलेला. मी अजून ताकदीने आत ओढलं तर तो पण आत शिरला. एकदम लाजल्यासारख झाल मला. टॉवेल कुठ धरावा नक्की माझ मलाच समजत नव्हत. तेव्ध्यते त्याने मला मिठीत घेतल आणि बाहेर निघून गेला. जाताना दार ओढून घेतल बाहेरून. मी बाहेर आले आणि मला म्हणाला आपण आज पिच्चर बघायला जाऊ. आम्ही मग पिच्चर बघायला गेलो. एक ठीक आहे आम्ही सलग दोन पिच्चर बघितले. मग एका बागेत गेलो. तिथ बसून गप्पा मारल्या आणि तिथून घरी आलो. घरी आलो आता जेवण नको होत. कारण बाहेरच थोड थोड खालेले त्यामुळे पोट भरलेलं. आणि अस हि घरात पाणी नव्हत जास्त. उद्याच पण नक्की नव्हत त्यामुळे आत्ताच पाणी उद्यापर्यंत वाचवायचं होत. मग आम्ही झोप्य्च्या तयारीत होतो नऊ वाजताच. आणि दोघ आम्ही बोलत असताना अचानक बेल वाजली. बघितल मी जाऊन तर बाहेर आई आणि बाबा. ते आले म्हणाल्यावर जेवण बनवल. दहा पर्यंत त्यांना जेवण देऊन ते जेवून झोपले. मग मी भांडी वैगरे सगळ करून झोपले. तोपर्यंत अन्वित झोपला होता. 10 FEB 2018
आज मी कामाला गेले तर सगळे निवांत बसलेले. आज काहीच काम नव्हत. प्रगती माझ्यासोबत गप्पा मारत होती. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा फोटो दाखवला. त्याची माहिती सांगितली. खूप खुश होती ती. अस कुणी आनंदी आपल्या आसपास असल कि आपला पण मूड आनंदी बनतो. आमच्या गप्पा मध्ये मध्ये काम सुरु होत. तेवढ्यात एक मुलगी आली. तिच्या वडिलांच्या खात्यात पैसे भरायला. सोबत तिच्या एक मुलगी होती. खूप सुंदर. तिच्याकडे बघून कुणाला वाटणार पण नाही कि तीच लग्न झालंय. मला हि वाटलं नव्हतं पण तिच्या गळ्याकडे माझं लक्ष गेलं तेव्हा समजलं. ती जेव्हा आली तेव्हा मी बघितलं नव्हतं त्यामुळे मला कळालच नाही कि तीच लग्नच नाही तर ती प्रेग्नेंट सुद्धा आहे. मी पैसे खात्यात जमा केले आणि न राहवून तिला तीच नाव विचारलं तिने सांगितलं 'प्रतीक्षा'...ती निघून गेली. पण खरच आई होण किती सुंदर गोष्ट आहे हि. एक वेगळंच तेज येत चेहऱ्यावर. मला हि असच आई व्हायचं आहे. मी पण अशीच दिसेन असा विचार मला प्रतीक्षाला बघून आला. मी माझं काम उरकलं संध्याकाळी आले घरी. घरी आले तर अन्वित माझ्या आधी घरी आलेला. आत कपडे बदलायला गेले तर त्याने माझ्यासाठी सफरचंद आणलेले. व्हिटॅमिनच्या गोळ्या आणि काही पावडर आणलेल्या. मला तर खूप आनंद झाला. आम्ही जेवलो. रात्री त्याने मला झोपताना थोडं दूध आणून दिल ते पित होते तर सफरचंद एक चिरून दिल. नको म्हणत असताना पण खायला लावलं. त्याची हि आत्ता पासून काळजी घेणं मला अगदी रडूच येत होत आणि त्याच्यावरच प्रेम मनात अजूनच वाढत होत. मी तर त्याला रात्री मिठी मारूनच झोपले.
०९11 feb 2018
आज सकाळी उठले मी. पाणी भरल सगळ आवरल आणि डबा बनवायला घेतला. मोबाईल माझा लावलेला. वाजायला लागला. मी जाऊन कॉल उचलला तर प्रगतीचा कॉल आलेला. तिने मला आठवण करून द्यायला कॉल केलेला आज मला डॉक्टरकडे जायचं होत चेकअपला. तेवढ सांगून तिने कॉल कट केला. तेवढ्यात मोबाईलवर रिमांइंडर अलार्म वाजला त्यावर पण तोच मेसेज होतो. मी अलार्म बंद केला आणि gas बंद करून अन्वितकडे गेले. तो झोपलेला. त्याला उठवळ आणि सांगितल आपल्याला आज डॉक्टरकडे जायचं आहे. आपल्याला म्हणजे आपल्यालाच. तू सोबत ये माझ्या अस मी सांगितल त्याला. तर तो हो बोलला. आवरायला लागला. आणि तेवढ्यात त्याला कॉल आला. अर्थातच, ऑफिसमधून आलेला. त्याला अर्जंट बोलावलेल. तो गेला निघून माझ काही न ऐकता. माझ्याकडे न बघता. डबासुध्दा घेऊन गेला नाही. खूप मनाला लागल मला. मी डॉक्टरना कॉल लावला. त्यांनी बोलवल होत. परत ते दिल्लीला जाणार होते एक आठवड्यासाठी. मग काय माझ मीच गेले. मला खूप राग आलेला अन्वितचा. मी आता ठरवलच त्याच्याशी बोलायचं नाही. दर वेळेस मी त्याला समजून घेते आणि तो वागलेल सगळ विसरून जातो. बसस...... मी डॉक्टरांकडून जाऊन आले. येताना औषध वैगरे घेऊन मी निघून गेले कामाला. आता घरी बसून तरी मी काय करणार होते ? त्याने नाही नेला मीपण नही घेतला डबा. मला उशिरा आलेल बघून चेअरमन सर बघायला लागले. मी आपली मान खाली घेऊन आत आले. आणि माझ्या खुर्चीवर जाऊन बसले. प्रगती माझ्या शेजारी लगेच आली. माझ्याशी बोलायला लागली. आधीच माझ डोक गरम झालेलं आणि तीची बडबड. तिला गप बसायला तरी कस सांगू कळत नव्हत. म्हणून मी ऐकत बसले. तेवढ्यात मला चेअरमन सरांनी आत बोलावल. काळ केलेलं काम चुकलेल माझ. चूक छोटीशी होती. पण त्याचा फार माझ्यावर राग काढला त्यांनी. बहुतेक त्याचं पण सकाळी बायकोशी भांडण झाल असाव आणि कोण नाही तर नेमक मी सापडले त्यांच्या कचाट्यात. घेतल ऐकून. अगदी रडकुंडीला आले. डोळ्यात पाणी आल. तशीच सरांच्या हातातली फाईल घेऊन बाहेर आले. काम सुरु केल. प्रगती विचारात होती मला काय झाल वैगरे तिला मी सांगितल सगळ तिला पण वाईट वाटल. दीड वाजायला आले. चेअरमन सर गेले बाहेर. प्रगतीने डबा काढला. मी तर काय आणलाच नव्हता. तिने मला तिच्यात खायला लावल. मी नाही बोलले. तरी जबरदस्ती केली. तरी मी काय ऐकल नाही. ती सतत बोलत होती खा खा म्हणून मीच बाहेर निघून गेले. शेजारी एक मेडिकल होत तिथ क्रोसिन आणायला गेले. अन्वित पतसंस्थेत आला. मी मागून आत आले.अन्वित : डबा.... आणला नाहीस ना तू ?श्रीशा : का ? तू घेतला नाहीस का ? अन्वित : नाही. आधी तू खायचं मग मी. श्रीशा : मला नकोय. जा तो घेऊन. अन्वित : अस नको करू. खाऊन घे. श्रीशा : नकोय मला. गोळी आणलीय मी. खाईन ती.अन्वित : काही न खाता कशाला गोळी खातेंस ?श्रीशा : जाऊदे. अन्वित : डॉक्टरकडे जाऊन आलीस ?श्रीशा : तुला आहे लक्षात आजची डेट ?अन्वित : हो म्हणून तर सरांना खोट सांगून आलो तुला न्यायला. चल जाता.श्रीशा : काही नको जाऊन आले मी. गोळ्या पण आणल्या नवीन.अन्वित : मग त्याला खायला नको का श्रीशा ..?श्रीशा : नको. जा तू डबा घेऊन तसाच राहील.अन्वित : बर बर. जातो पण नीट बोलणार पण नाहीस का ?श्रीशा : नाही. मला खुओ वाईट वाटलं आहे आता नाही माझी इच्छा बोलायची.अन्वित : होका... ? बर. भेटू संध्याकाळी.श्रीशा : हम. मला नाही बोलायचं आणि भेटायचं. तेवढ्यात चेअरमन सर आले.श्रीशा : जा तू.अन्वित : ऐक ना.श्रीशा : जा तू नाही बोलायचं मला तुझ्याशी.....प्रगती : श्रीशा सर बोलावतायत.श्रीशा निघून गेली. अन्वित हातात डबा घेऊन थांबलेला वाट बघून निघून गेला.
१०
अन्वित बाहेरच थांबलेला पतसंस्थेच्या. त्याला वाटलं श्रीशा येईल. पण ती आली नाही. श्रीशाला आत काम लागलं. ती काम करत बसली. थोड्यावेळाने तीच काम झालं. ती तिच्या टेबलाकडे आली. तिथले जे शिपाई होते ते भजी पाव खायला घेऊन आले. दारात अन्वितला बघून.
शिपाई : साहेब, मॅडमकडे आला का ?
अन्वित : अहो साहेब काय म्हणता मी तुमच्यापेक्षा लहान आहे.
शिपाई : असुदे हो..
अन्वित : कस तरी वाटत. नको.. हो तिचा डबा विसरला ती घरीआ... तो द्यायला आलो.
शिपाई : मग या कि आत आहेत त्या आत.
अन्वित : नाही जाऊन आलो मी आत. पण तिला भूक नाही म्हणाली.
शिपाई : काहो साहेब ? भांडलात का ?
अन्वित : तस नाही. आज तिला डॉक्टरकडे घेऊन जायचं होत आणि नेमकं मला काम आलं ऑफिसमध्ये. सरांनी बोलवलं कि जायला लागलं. मीपण उपाशी आहे अजून. मग ते तिला त्याचा राग आला. मी सोबत गेलो नाही तिच्या म्हणून.
शिपाई : हा..त्तीच्या... एवढंच वे. चालत तेवढं साहेब. चला येत का गरमागरम भज्या आणल्यात खावा सोबत. मीपण डबा आणला नाही बघा. बायको गावाला गेलीय.
अन्वित : नाही खावा खावा तुम्ही. मी आता जातो. हा डबा फक्त तिला द्याल का ?
शिपाई : हो देणार कि.
शिपायाने डबा घेतला. अन्वित गाडीवर बसला. गाडीची किक मारली आणि पतसंस्थेकड बघितलं. शिपाई पण आत गेले. पण श्रीशा बाहेर आलीच नाही. अन्वित निघुन गेला. शिपाई श्रीशाच्या टेबलाजवळ गेले.
शिपाई : मॅडम, हा तुमचा डबा.
श्रीशा : अहो नको मी गोळी खाल्ली.
शिपाई : अहो खाऊन घ्या कि पण.
श्रीशा : बघते. नंतर खाईन.
शिपाई : मी घेतो खाऊन.
श्रीशा : हो काका.
प्रगती डब्याच झाकण लावत.
प्रगती : दाजी, खूप वेळ थांबले ग.
श्रीशा : हा. असुदे जरा कळू दे. बायकोला किती त्रास होतो ते.
प्रगती : आज काय बोलणारच नाहीस का त्यांच्याशी ?
श्रीशा : बोलणार नाही त्याच्या आवडता गाजराचा हलवा बनवून देणारे.
प्रगती : ओ... नौटंकी. कशाला त्यांना एवढा त्रास द्यायचा मग.
श्रीशा : सूट दिली कि मग पुढच्याला आपली किंमत राहत नाही ना ग.
प्रगती : असुदे .. पण बोल आज त्यांच्याशी... खूप दुखी झालेत बिचारे दाजी.
श्रीशा : नक्की ठरव तू. दाजी का जीजू.
प्रगती : दोन्ही पण तेच ना. नाव बदललं म्हणून नात आणि व्यक्ती बदलणारे का ?
श्रीशा : हम.
श्रीशाने डबा उघडला. आणि एक घास खाल्ला. तिला खायची इच्छा होईना. तरी कशी तरी एक चपाती खाल्ली.
आणि डबा लावून बाहेर हात धुवायला गेली. इकडे तिच्या मोबाईल वर दोन मिसकॉल येऊन गेले अन्वितचे. आणि तिसरा कॉल आला. प्रगतीने तो उचलला.
प्रगती : हा बोला ना जीजू.

११
अन्वितच्या मोबाईल वरून : हा नंबर कुणाचा आहे ?
प्रगती : तुम्हाला कोण पाहिजे ? कारण तुम्ही बोलताय तो नंबर माझ्या जीजूचा आहे. आणि हा इकडचा नंबर त्यांच्या बायकोचा आहे.
अन्वितच्या मोबाईल वरून : त्या कुठे आहेत ?
प्रगती : आहे इथंच बाहेर गेलीय.
अन्वितच्या मोबाईल वरून : बर ऐका. आत्ता मी मेढयाला जात होतो. माझ्या समोरून हि व्यक्ती गाडीवरून जात होती. आणि
प्रगती : आणि ?
तेवढ्यात श्रीशा आली.
श्रीशा : काय झालं कोण आहे ग ?
प्रगती : एक मिनिट.
श्रीशा : माझा आहे ना हा मोबाईल ?
प्रगती : हो.
अन्वितच्या मोबाईल वरून : ट्रकच्या चाकाखाली गेले ते. ट्रक गेला. रस्त्यावर गाड्या होत्या त्या थांबल्या पण डोकं पूर्ण गेलं चाकाखाली संपल सगळं. त्यांना सांगा आणि लवकर सिव्हिल हॉस्पिटलला या. बॉडी तिकडे घेऊन गेलेत पोलीस. मी हि जातोय तिकडे मोबाईल देईन तिथेच.
कॉल कट झाला. सगळं संपलं. प्रगती जी बडबडी चुलबुली होती ती आता गप्प झाली. मोबाईल टेबलवर ठेवून तिने श्रीशाकडे बघितलं. श्रीशा काम करत बसलेली.
श्रीशा : काय झालं बोलायला सांग माझ्याशी अस बोलत असेल ना तो.
प्रगती : अं..कोण ?
श्रीशा : अन्वित गं.
प्रगती : न.न. नाही.
प्रगतीने साठवून ठेवलेला पाण्याचा बंध अगदी डोळ्यातून वाहायला लागला. जणू काय धरणाच्या दरवाजातून पाणी सोडलं असावं.
श्रीशा तिला जवळ ओढून घेते. श्रीशा तिला विचारते काय झालं पण ती काही बोलायला तर तयारच नाही.
श्रीशा : काय झालं सांगशील का ? आता मला तुला अस बघून रडायला येतंय लवकर सांग.
प्रगती : श्रीशा... अग जीजू...
श्रीशा : काय अन्वित ?
प्रगती : ऍक्सिडेंट झालाय.
श्रीशा उठली आणि सगळं तिथंच ठेवून बाहेर गेली. प्रगती लागलीच बाहेर गेली. तिचा हात धरला. आणि ओढून धरलं. या दोघींना अस बघून लागलीच कांबळे काका त्यांच्या जवळ गेले आणि श्रीशाला सावरलं.
प्रगती : ऎक जरा शांत हो.
श्रीशा : काय झालं अन्वितला ?
प्रगती आणि कांबळे श्रीशाला घेऊन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आले. तिथे पोलीस होते श्रीशा पळत जाऊन अन्वित जवळ जोर जोरात किंचाळून रडायला लागली. प्रगतीला पोलिसांनी बाजूला बोलावलं. कांबळे श्रीशाजवळ तिला सावरत होते. श्रीशाने अन्वितच्या तोंडावरच बेडशीट काढलं. पण तो अन्वित आहे वाटतच नव्हतं. ती रडतच होती. तिने खिशात त्याच्या तपासलं. त्याच लायसन दिसलं. तिची खात्री पटली तो अन्वितच आहे अजून ती जोराने रडायला लागली. तिचा रडता रडता हात त्याच्या पँटच्या खिशाला हात लागला आणि ती शांत झाली. आणि तिने खिशात हात घातला.
सकाळी अन्वितच काम झालं आणि तो लगेच घरी आला. घराला कुलूप. दोघांकडे दोन चाव्या होत्या. त्याने कुलूप उघडून त्याच्यासाठी श्रीशाने भरलेला डबा त्यातून त्याने चपात्या बाहेर काढून तव्यावर गरम केल्या. डबा घेतला कुलूप लावलं आणि श्रीशाकडे यायला निघाला. पतसंस्थेच्या अलीकडे मेडिकल होत तिथून त्याने श्रीशाच्या आवडती कॅडबरी घेतली. आणि आत आला. ती त्याच्याशी नीट बोलली नाही. डबा घेतला नाही या नादात तो तिला कॅडबरी द्यायला विसरला ती तशीच त्याच्या खिशात राहिलेली.
समाप्त.
सावधान....! या कथेला किंवा यातील कोणताही संवाद, प्रसंग लेखकच्या परवानगीशिवाय कुठेही प्रसिद्ध करणे किंवा दाखवणे कायदेशीर गुन्हेगारी ठरेल. असे केल्यास आपल्याला ५०लाख रुपयेपर्यंतचा आर्थिक दंड किंवा दोन वर्ष कैद होऊ शकते. त्यामुळे या कथेला लेखक अजिंक्य अरुण भोसले यांच्याकडून परवानगी काढूनच याला प्रसिध्दी द्या.